उत्तर प्रदेशातील आग्रा विद्यापीठाने दिलेल्या एका मार्कशीटनुसार अभिनेता सलमान खानने बीएची परीक्षा दिली असून त्याला 35 टक्के मार्क मिळाले आहेत, म्हणजेच तो काठावर पास झाला आहे. सलमान खानव्यतिरिक्त काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या विद्यापीठातून परीक्षा दिली असल्याचं मार्कशीटवरून उघड झालं आहे. हे दोघे चांगले शिकलेले असताना त्यांना परत परीक्षा द्यायची गरज काय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल मात्र खरी परिस्थिती ही आहे की या दोघांनी परीक्षा दिली नसून त्यांना करून मार्कशीट बनवण्याचं काम दिलेल्या कंपनीने परीक्षेला बसवल्याचं दाखवलंय.मार्कशीटच्या छपाईचं काम एका त्रयस्थ कंपनीला देण्याचा निर्णय आग्रा विद्यापीठाने घेतला होता. या कंपनीने घातलेल्या घोळामुळे मार्कशीटवर विद्यार्थ्याच्या फोटोऐवजी सलमान खान आणि राहुल गांधी यांचे फोटो लावण्यात आले आहे. अशा दोन मार्कशीट सध्या सापडल्या असून इतर मार्कशीटमध्ये असा घोळ झालेला नाही ना याचा शोध घेतला जातोय. मात्र अशी कोणतीही चूक झालेलीच नाही असा कांगावा आग्रा विद्यापीठातर्फे त्यांचे जनसंपर्क अधिकारी जीएस शर्मा यांनी केला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews